पडताळून पाहूया! मी मुलांना वाढवतोय की यंत्रमानव बनवतोय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांना सतत सूचना देणारे पालक तुम्ही पाहिले आहेत का? ‘उठलास का?’, ‘ब्रश केलास का?’, ‘आंघोळीला जा’, ‘जेवलास का?’, ‘अभ्यास करतोय ना?’ अशा अनेक प्रश्नांची आणि सूचनांची सरबत्ती मुलांवर सतत होत असते. अनेकदा नोकरी करणाऱ्या पालकांकडे वेळ कमी असल्यामुळे त्यांना घाईघाईत मुलांची सगळी कामं पूर्ण करून घ्यायची असतात. त्यामुळे नकळतपणे ते मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी सूचना देत राहतात. तुम्हालाही असा प्रश्न पडतो का, की मुलांना सतत सूचना देऊन आपण त्यांना यंत्रमानव (robot) तर बनवत नाही आहोत? यंत्रमानवाला जसे प्रोग्रामिंग करून काम करायला सांगितले जाते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांचे नकळतपणे प्रोग्रामिंग करत आहोत का? सतत सूचना देण्याचे दुष्परिणाम मुलांना सतत सूचना दिल्याने त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. त्यांना प्रत्येक वेळी एखाद्या कामासाठी किंवा निर्णयासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय लागते. लहानपणी ही सवय लागली की, मोठी झाल्यावरही ती कायम राहते. मुलांना स...
Posts
पडताळून पाहूया!
- Get link
- X
- Other Apps
पडताळून पाहूया! पुष्प: 2 मी कोण? : 'मी' पणाचा गोड गैरसमज आणि त्याचे दुष्परिणाम आपण सगळेच कधीतरी अशा एका गोड गैरसमजात वावरतो, जिथे एखादे अवघड काम आपल्या हातून यशस्वी झाल्यावर आपली छाती अभिमानाने फुलते आणि मान ताठ होते. एकापाठोपाठ एक कठीण कामे आपल्याशिवाय कोणी करू शकत नाही , असा एक विचार मनात घर करून राहतो. आणि याच विचारातून जन्म होतो 'मी' चा, म्हणजेच अहंकाराचा . हा 'मी' पणा, हा अहंकार खरंच खूप घातक आहे. "मला बऱ्याच गोष्टी जमतात, मी त्या करतो, माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही" असा समज करून घेणे अतिशय चुकीचे आहे. या नादात आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या इतरांना आपल्यापेक्षा सहज जमतात याकडे आपले लक्षच राहत नाही. निसर्गाची देणगी: विविध बुद्धिमत्ता आणि परस्परावलंबित्व खरं तर, निसर्गाची निर्मिती इतकी महान आहे की आपण फक्त तिचा एक छोटासा भाग आहोत. गार्डनरच्या मल्टीपल इंटेलिजन्स सिद्धांतानुसार , प्रत्येक व्यक्तीमध्ये नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. त्यापैकी दोन-तीन तर अगदी प्रभावी असतात. याचा अर्थ असा की, प्रत्येक माणूस एक-दोन क्षेत्रांत अतिशय यशस्वी ...
- Get link
- X
- Other Apps
पडताळून पाहूया! पुष्प: १ नाही पचवता येणे: चांगले की वाईट? अनेकदा आपण जेव्हा एखाद्याकडे काहीतरी मागतो आणि समोरच्या व्यक्तीने 'नाही' म्हटले की लगेच आपल्याला राग येतो. अगदी नाकावरचा राग शेंड्यावर जातो म्हणतात ना तसे. ही सवय लहानपणापासूनच लागते. लहानपणी चॉकलेट, वेफर्स, कुरकुरे यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत म्हणून आई-वडील 'नाही' म्हणतात. पुढे कुमारवयात शालेय वस्तू, मोबाईल फोन, स्कूटर, महागडे कपडे किंवा शूज यांसारख्या गोष्टींची मागणी केली जाते. त्यांनाही कधीकधी आत्ता मिळणार नाही असे ऐकावे लागते. लग्नानंतरही, जेव्हा आपण जोडीदाराला किंवा मुलांना 'या ट्रिपला जायचं का?' असे विचारतो आणि ते कामामुळे नकार देतात, किंवा सासू-सुनेच्या नात्यात एखादी मागणी आणि त्यावर मिळणारा नकार अशी अनेक उदाहरणे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. पण या नकारामागे समोरच्या व्यक्तीचा चांगला हेतू असू शकतो, किंवा ती व्यक्ती आर्थिक अडचणीत असू शकते, म्हणजेच 'नाही' म्हणण्यामागे काहीतरी ठोस कारण असू शकते, असा विचार किती लोक करतात? याउलट, आपली मागणी नेहमीच फेटाळल...