Posts

पडताळून पाहूया!

Image
  पडताळून पाहूया!   पुष्प: 2 मी कोण? : 'मी' पणाचा गोड गैरसमज आणि त्याचे दुष्परिणाम आपण सगळेच कधीतरी अशा एका गोड गैरसमजात वावरतो, जिथे एखादे अवघड काम आपल्या हातून यशस्वी झाल्यावर आपली छाती अभिमानाने फुलते आणि मान ताठ होते. एकापाठोपाठ एक कठीण कामे आपल्याशिवाय कोणी करू शकत नाही , असा एक विचार मनात घर करून राहतो. आणि याच विचारातून जन्म होतो 'मी' चा, म्हणजेच अहंकाराचा . हा 'मी' पणा, हा अहंकार खरंच खूप घातक आहे. "मला बऱ्याच गोष्टी जमतात, मी त्या करतो, माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही" असा समज करून घेणे अतिशय चुकीचे आहे. या नादात आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या इतरांना आपल्यापेक्षा सहज जमतात याकडे आपले लक्षच राहत नाही. निसर्गाची देणगी: विविध बुद्धिमत्ता आणि परस्परावलंबित्व खरं तर, निसर्गाची निर्मिती इतकी महान आहे की आपण फक्त तिचा एक छोटासा भाग आहोत. गार्डनरच्या मल्टीपल इंटेलिजन्स सिद्धांतानुसार , प्रत्येक व्यक्तीमध्ये नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. त्यापैकी दोन-तीन तर अगदी प्रभावी असतात. याचा अर्थ असा की, प्रत्येक माणूस एक-दोन क्षेत्रांत अतिशय यशस्वी ...
Image
    पडताळून पाहूया!   पुष्प: १ नाही पचवता येणे: चांगले की वाईट? अनेकदा आपण जेव्हा एखाद्याकडे काहीतरी मागतो आणि समोरच्या व्यक्तीने 'नाही' म्हटले की लगेच आपल्याला राग येतो. अगदी नाकावरचा राग शेंड्यावर जातो म्हणतात ना तसे. ही सवय लहानपणापासूनच लागते. लहानपणी चॉकलेट, वेफर्स, कुरकुरे यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत म्हणून आई-वडील 'नाही' म्हणतात. पुढे कुमारवयात शालेय वस्तू, मोबाईल फोन, स्कूटर, महागडे कपडे किंवा शूज यांसारख्या गोष्टींची मागणी केली जाते. त्यांनाही कधीकधी आत्ता मिळणार नाही असे ऐकावे लागते. लग्नानंतरही, जेव्हा आपण जोडीदाराला किंवा मुलांना 'या ट्रिपला जायचं का?' असे विचारतो आणि ते कामामुळे नकार देतात, किंवा सासू-सुनेच्या नात्यात एखादी मागणी आणि त्यावर मिळणारा नकार अशी अनेक उदाहरणे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. पण या नकारामागे समोरच्या व्यक्तीचा चांगला हेतू असू शकतो, किंवा ती व्यक्ती आर्थिक अडचणीत असू शकते, म्हणजेच 'नाही' म्हणण्यामागे काहीतरी ठोस कारण असू शकते, असा विचार किती लोक करतात? याउलट, आपली मागणी नेहमीच फेटाळल...