पडताळून पाहूया!
पुष्प: १
नाही पचवता येणे: चांगले की वाईट?
अनेकदा आपण जेव्हा एखाद्याकडे काहीतरी मागतो आणि समोरच्या व्यक्तीने 'नाही' म्हटले की लगेच आपल्याला राग येतो. अगदी नाकावरचा राग शेंड्यावर जातो म्हणतात ना तसे.
ही सवय लहानपणापासूनच लागते. लहानपणी चॉकलेट, वेफर्स, कुरकुरे यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत म्हणून आई-वडील 'नाही' म्हणतात. पुढे कुमारवयात शालेय वस्तू, मोबाईल फोन, स्कूटर, महागडे कपडे किंवा शूज यांसारख्या गोष्टींची मागणी केली जाते. त्यांनाही कधीकधी आत्ता मिळणार नाही असे ऐकावे लागते. लग्नानंतरही, जेव्हा आपण जोडीदाराला किंवा मुलांना 'या ट्रिपला जायचं का?' असे विचारतो आणि ते कामामुळे नकार देतात, किंवा सासू-सुनेच्या नात्यात एखादी मागणी आणि त्यावर मिळणारा नकार अशी अनेक उदाहरणे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात.
पण या नकारामागे समोरच्या व्यक्तीचा चांगला हेतू असू शकतो, किंवा ती व्यक्ती आर्थिक अडचणीत असू शकते, म्हणजेच 'नाही' म्हणण्यामागे काहीतरी ठोस कारण असू शकते, असा विचार किती लोक करतात? याउलट, आपली मागणी नेहमीच फेटाळली जाते असाच विचार पहिल्यांदा मनात येतो आणि मग नकारात्मक (स्वगत म्हणजे स्वतःशीच संवाद ) विचार सुरू होतात.
खरंच 'नाही' पचवणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित समजून न घेणे आहे का?
त्यामागील कारण समजून घेऊन त्यावर काहीतरी योग्य तोडगा काढणे चांगले ?
माझ्या मते, 'नाही' पचवता येण्याचे अनेक फायदे आहेत:
* नात्यांचे बंध घट्ट होतात: जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचा 'नाही' स्वीकारतो आणि त्यामागील कारण समजून घेतो, तेव्हा गैरसमज दूर होतात आणि नात्यांमध्ये अधिक सामंजस्य येते, ज्यामुळे नाती अधिक घट्ट होतात आणि टिकतात.
* सकारात्मक विचारांची सवय लागते: 'नाही'ला सकारात्मकतेने सामोरे गेल्याने आपल्या मनात नकारात्मक विचार घर करत नाहीत. यामुळे नकळतपणे आपण अधिक आनंदी जीवन जगू शकतो.
* आत्म-नियंत्रण वाढते: नकाराला शांतपणे स्वीकारणे हे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे लक्षण आहे. यामुळे आपली सहनशीलता वाढते आणि आपण अधिक संयमी बनतो.
* नवीन संधी शोधण्याची प्रेरणा मिळते: जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा आपण आपोआपच दुसरे पर्याय शोधू लागतो. 'नाही' स्वीकारल्याने आपल्याला नवीन विचार करण्याची आणि वेगळ्या संधी शोधण्याची प्रेरणा मिळते.
* वास्तववादी दृष्टिकोन येतो: प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही, हे 'नाही' स्वीकारल्याने आपल्याला समजते. यामुळे आपण अधिक वास्तववादी बनतो आणि अनावश्यक अपेक्षा टाळतो.
याव्यतिरिक्त, 'नाही' स्वीकारल्याने आपली लवचिकता (resilience) वाढते. आयुष्यात अनेकदा अनपेक्षित गोष्टी घडतात आणि 'नाही'ला सामोरे जाण्याची क्षमता आपल्याला अशा परिस्थितीत अधिक मजबूत बनवते. यामुळे आपण अपयशातून शिकतो आणि पुन्हा प्रयत्न करण्याची ऊर्जा मिळते.
तुमचे याबद्दल काय म्हणणे आहे? नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
स्वगत, resilience, आत्म नियंत्रण, वास्तववादी दृष्टिकोन,
खरच हेच आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे.
ReplyDeleteखूप नेमक्या शब्दात मांडले आहे.
असेच अजून काही मुद्द्यांवर विचार मांडावे.
Thank you
ReplyDelete"ना" स्वीकारना बहुत मुश्किल होता है परंतु जिसने "ना" स्वीकार लिया उसकी जिंदगी थोड़ी आसान हो जाती है!!
ReplyDeleteThank you sirji
ReplyDelete